Avilability: In stock
रोजच्या व्यवहारात आपण असे अनेक शब्द वापरतो की ज्यांचा पूर्ण अर्थ आपल्याला ठाऊक नसतो, पण सरावानं आपण ते वापरत असतो. पण अशा शब्दांचा नक्की अर्थ आपल्याला कळला, त्याचे इतर भाऊबन्ध कळले, इतरत्र होत असलेले त्याचे प्रयोग कळले तर आपल्या बोलण्याला एक भरीवपणा येत असतो. व्यक्तीच्या बोलण्याला भरीवपणा आल्यावरच भाषेची समृद्धि वाढते. शेवटी भाषेची समृद्धि म्हणजे ती भाषा बोलणार्यांची समृद्धि. इंग्लिश, फें्रच वगैरे भाषांमध्ये अशी असंख्य साधनं झाल्यावरच त्या समृद्ध झाल्या. मराठीला म्हणजे मराठी भाषिकाला प्रथम भाषिक क्षेत्रात नि मग व्यवहारातही समृद्ध होण्यासाठी हे एक प्रभावी साधन आहे.