Loading

Hamid Dalwai : Krantikari Vicharwant

हमीद दलवाई : क्रांतिकारी विचारवंत (विस्तारित द्वितीय आवृत्ती)

Author : Edtr. Shamsuddun Tamboli (संपादक : प्रा. शमसुद्दिन तांबोळी)

Price: 130  ₹104

Discount: 20%

Avilability: In stock

ISBN : 9788184835700
Publisher : Diamond Publications
Published on : 2015
Binding type : Paperback
Edition : 2
Language : Marathi
Rating :

‘‘हमीदशी माझा स्नेह होता हे म्हणतानादेखील त्या म्हणण्यातून आत्मप्रौढीचा ध्वनी उमटेल की काय अशी मनाला शंका यावी, इतका तो मोठा होत गेलेला होता. ज्या जिद्दीने तो ह्या सार्‍या अन्यायाविरुद्ध लढत होता ते पाहिल्यावर त्याची भेट ही एखाद्या वीरपुरुषाच्या दर्शनासारखी वाटत होती, असे म्हणण्यात मला यत्किंचितही अतिशयोक्ती वाटत नाही.’’ - पु. ल. देशपांडे ‘‘....धार्मिक मूलतत्त्ववाद, दहशतवाद, अस्मितेचे प्रश्‍न, बहुसंस्कृतिवाद, बहुसंख्याक व अल्पसंख्यांक आणि उत्तर आधुनिकतावादाने पुढे मांडलेले अनेकविध प्रश्‍न यांचा विचार आपणास करावा लागणार आहे. मुस्लिम समाजाला स्वरचित कोषाबाहेर येऊनच खुलेपणाने या प्रश्‍नाचा विचार करावा लागणार आहे. त्या दृष्टीने हमीद दलवाई यांनी मांडलेली भूमिका ही अत्यंत मोलाची व उपयुक्त आहे.’’ - भाई वैद्य ‘‘हा देश समर्थ व्हावा, जगातील शक्तिमान राष्ट्रांच्या पंक्तीला बसावा असे आपल्याला वाटत असेल तर या देशातील समाज हा शास्त्रीय आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनावर आधारलेला, भौतिक श्रद्धा बाळगणारा आणि चैतन्यशील बनला पाहिजे, याबद्दल कुणाचे दुमत होईल, असे वाटत नाही. याकरता, ज्या धर्मश्रद्धा समाज आधुनिक आणि प्रगतिकारक बनविण्याच्या आड येतात, त्या दूर सारण्याची प्रक्रिया पुढे चालविणे म्हणजेच आपण धर्मनिरपेक्षतेकडे वाटचाल करणे आहे.’’ - हमीद दलवा

Be the first to review


Add a review