Avilability: In stock
हिंसा किंवा दहशतवाद यांचा विचार केवळ हल्ले, अतिरेकी धर्म, राजकारण या टप्प्यांनी न करता, मानवी मनोवृत्तींच्या ठेवणीचा प्रथम विचार केला पाहिजे. जन्मजात आक्रमकतेला वाईट परिस्थितीची जोड मिळाली तर आक्रमकता हिंसेत परिणत होते. ही निर्माण झालेली हिंसक मनोवृत्ती . हिंसा ही भावनाच मानसिक विकृतींमध्ये मोडते, तर विकृतीही सामाजिक, मानसिक, शारीरिक, आर्थिक, धार्मिक आणि राजकीय अत्याचाराने जोपासली जाते. त्यामुळे हिंसाचार कोणत्या मानसिकतेमुळे निर्माण होतो, हे कळले तर त्या मानसिकतेत कोणत्या मार्गांनी बदल घडवणे शक्य आहे, ह्याचा निष्कर्ष काढता येईल. त्यासाठी कराव्या लागणार्या चिंतनाची बैठक देऊ करणारा हा विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, जाणकार व्यक्तींच्या मुलाखतींचा संग्रह..