Avilability: In stock
देशासाठी सर्वस्व अर्पण करणार्यांना आपण विसरत चाललो आहोत, ही क्लेशदायक घटना आहे. ‘विसरला तो घसरला’ हे खरेच आहे. ह्या थोरांना आम्ही विसरलो त्यामुळे आम्ही घसरत चाललो आहोत. आमची अवनती होत आहे. नवीन पिढीला जर हा ज्वलंत स्फूर्तिदायक, त्यागाने भरलेला इतिहास कळला तर त्यांना प्रेरणाच मिळेल नि ‘देश हा देव असे माझा’ हे विचार त्यांच्या मनात घोळू लागतील. देशाची अवनती थांबेल. उन्नतीला प्रारंभ होईल.. दुसरे असे की केलेल्या गोष्टीची जाणीव ठेवणे म्हणजेच कृतज्ञता ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पु.ल.म्हणतात, ‘कृतज्ञता हा माणसाला मिळालेला महान अलंकार आहे.’ तेव्हा ज्यांच्यामुळे आम्ही स्वातंत्र्याचा मुक्त आनंद मिळवू शकलो, त्यांच्याविषयी पूज्यभाव, आदरभाव बाळगणे हेही अत्यंत महत्त्वाचेच. जाता जाता, सार्धशताब्दीनिमित्त १८५७च्या अनेक ज्ञात-अज्ञात वीरांना येथे वंदन केलेले आहे. हे पुस्तक म्हणजे फार मोठ्या इतिहासाचा एक छोटा भाग (ट्रेलर) आहे. आबालवृद्ध सर्वांनाच ह्या देशभक्तांच्या, क्रांतिकारकांच्या गोष्टी नवीन वाटतील आणि मोठीच स्फूर्ती देऊन जातील. आपल्या संग्रही हा क्रांतिकारकांच्या गोष्टींचा संग्रह असावाच, अशी नम्र अपेक्षा !