Avilability: In stock
...एकदा मात्र, किणीकर बेसावध सापडले. कोल्हापूरला ‘धरती’ मासिकाच्या कचेरीत.... कोल्हापुरातल्या ह्या मैफिलीत मात्र त्यांचा सूर लागला. भारतीय शिल्प अंाणि चित्रकलेविषयी ते इतक्या जाणकारीने बोलत होते; आणि मासिकं आणि पुस्तकं यांच्या उच्च मुद्रणाविषयी किंवा लेआउटसंंबधीचे असे बारकावे समजावून देत होते की, आपण ज्यांना ओळखतो असे समजत आलो ते किणीकर हेच की कोणी दुसरे, अशी शंका यावी ! ...अजंठा, वेरूळ, बेलूर, हळेबीड, रजपूत चित्रकला, भारतीय हस्तकौशल्य ह्यांच्यावर बोलणारे किणीकर, हे त्यांचं माझ्या मनावर उमटून राहिलेलं चित्र... हा माणूस साहित्याइतकाच रंगरेषांच्या लीलांमध्ये गुंगणारा होता, हे किती अनपेक्षित रीतीने मला कळलं होतं... ...‘उत्तररात्र’ वाचताना वाटलं, ह्या अवलियाकडे आपण अधिक आस्थेने आणि आदराने पाहायला हवं होतं. त्यांनी स्वत: आदराची किंवा मानसन्मानाची चुकूनही अपेक्षा ठेवली नव्हती. म्हणून काय आपण त्यांना ओळखायला नको होते? आपण ओळखीच्या माणसाच्या बाबतीतही किती अनोळखी राहतो पहा, पण किणीकरांनी तरी स्वत:मधला हा चिंतनशील कलावंत असा दडवून का ठेवावा? ...ते दृष्टीआड राहू इच्छीत असले तरी त्यांना असं राहू द्यायला नको होतं. किणीकर काही अलौकिक ऋणे फेडायचीही इच्छा बाळगून होते. ‘ऋण फेडायाचे राहून माझे गेले ऋण फेडायाला पुन्हा पाहिजे मेले’ म्हणणार्या किणीकरांचे आपणही देणे लागत होतो हे फार उशिरा कळले...