Avilability: In stock
शाहाजींची संस्कृती थोर होती. त्यांच्या मनावर झालेले लहानपणापासूनचे संस्कार त्यांना हिंदवी स्वराज्याच्याच उद्दिष्टाकडे नेत होते. त्यांनी विद्वान आणि युध्दनिष्णात लोकांचा संग्रह केला होता. मराठी, फारसी, संस्कृत आणि कानडी अशा चार भाषांत ते बोलूं-लिहूं शकत होते. त्यांनी धर्मही फार मोठा केलेला होता. पित्यांनी सुरु केलेलें शिखरशिंगणापूरच्या तलावाचें काम शाहाजींनी राहिलेल्या ताली बांधून पूर्ण केलें. देवदेवळांना जशीं दानें दिलीं तशीचं पर्वणी, सण वगैरे निमित्तानेही मोठमोठीं दानें दिली.