Avilability: In stock
तीन हजार वर्षांच्या इतिहासातील सत्तेच्या नैतिक, कपटी, निर्दयी आणि उद्बोधक अशा पैलूंचे सार ह्या पुस्तकात ४८ प्रकरणांमधून अत्यंत बोचक आणि तरीही वेधक शैलीत स्पष्टीकरणासहित मांडण्यात आले आहे. ग्रंथाची चित्तवेधक विशिष्ट मांडणी आणि आशय ह्यातून ह्या ४८ नियमांवर कोणतीही कृत्रिम झळाळी न चढवता, मॅकिआव्हेली, त्सून झू, कार्ल फॉन क्लॉजेविट्स आणि इतर अनेक तत्त्ववेत्त्यांच्या तत्त्वज्ञानाचा संक्षिप्त साररूपाने आधार घेत, ह्या ग्रंथाची रूपरेषा आखलेली आहे. १. काही नियम विवेकाधारित आहेत ‘नियम १ : सत्तेपुढे शहाणपण नको!’ २. काही नियमात लपवाछपवी आहे ‘नियम ३ : हेतूची जाहीर वाच्यता? कदापि नाही!’ ३. काही नियम पूर्णपणे निर्दयतेला, क्रौर्याला वाहिलेले आहेत ‘नियम १५ : विरोधकांचा समूळ नायनाटच करा!’ तुम्हाला आवडो वा नावडो; पण हे सगळे नियम रोजच्या जीवनातील घडामोडीतही लागू पडतात असे दिसून आले आहे. क्वीन एलिझाबेथ १, हेन्री किसिंजर, पी.टी. बानम आणि ह्यांच्यासारख्या इतरही अनेक प्रसिध्द व्यक्तींनी सत्तेचा वापर करून जुलूम, फसवणुका केल्या आहेत किंवा सत्तेच्या अत्याचाराला ते बळी पडले आहेत. अशा लक्षवेधक उदाहरणांमुळे सर्वोच्च नियंत्रणातून लाभ व्हावा असे वाटणाऱ्या, त्याचे निरीक्षण करणाऱ्या आणि त्याविरुध्द लढणाऱ्या सगळ्यांना हे नियम भारून टाकतात.