Avilability: In stock
सोन्याची खाण असणारा भारत ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तालोलुपतेला बळी पडला. एका खासगी कंपनीनं केवळ चार दशकात दोन लाख सैनिकांना प्रशिक्षण दिलं आणि भारतासारख्या बलाढ्य देशावर वर्चस्व गाजवलं. या वसाहतवादी गळचेपीत कंपनीनं भारताची लूट माजवली. आज ज्याला खाजगीकरण म्हटलं जातं त्याची पाळमुळं ईस्ट इंडिया कंपनीनं भारतात रूजवली. हजारो मैल दूर एका छोट्याशा कार्यालयात एका बलाढ्य देशाविरोधात रणनीती आखली गेली आणि ती यशस्वी पारही पाडली गेली. ईस्ट इंडिया कंपनीच्या या जुलमी कारकिर्दीचा सडेतोड धांडोळा हे पुस्तक घेतं.