Loading

Dakshin Maharashtra

दक्षिण महाराष्ट्र : राजकीय चळवळी व नेतृत्व

Author : Dr. Arun Bhosale (डॉ. अरुण भोसले )

Price: 300  ₹240

Discount: 20%

Avilability: In stock

ISBN : 9789391948580
Publisher : Diamond Publications
Published on : 2022
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Rating :

" दक्षिण महाराष्ट्रातील संस्थानांस सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या व सांस्कृतिकदृष्ट्या मोठी वैशिष्ट्यपूर्ण परंपरा लाभलीआहे. आजवर या संस्थानांचा फारसा अभ्यास झालेला नाही. इतिहासाचे नामवंत अभ्यासक डॉ. अरुण भोसले यांच्या या ग्रंथाद्वारे प्रथमच दक्षिण महाराष्ट्रातील संस्थानांतील घडामोडींचा सुसंगत असा पट मांडला गेला आहे. संस्थानांतील राजकीय नेतृत्व व सामाजिक इतिहास यांत केंद्रस्थानी आहेत. वासहतिक सत्तासंबंध, स्वातंत्र्याचे धुमारे, चळवळींतील अंतरंग, अंतःप्रवाह आणि अंतर्विरोध यांनी गजबजलेला हा काळ होता. त्यामुळे संस्थांनी जीवनातील धामधूम काळाचे टकराव, एकमेकांना शह देणार्‍या घटना-घडामोडींचे इतिहासकथन या ग्रंथात आले आहे. छत्रपती शाहू कालखंड, ब्राह्मणेतर चळवळ, प्रजापक्षीय चळचळ, बाज्या-बैज्याचे बंड (रामोशी उठाव) या चळवळींबरोबरच फलटण, अक्कलकोट, औंध या चिमुकल्या संस्थांनांतील घडामोडींवर प्रस्तुत ग्रंथाद्वारे टाकलेला प्रकाशझोत महत्त्वाचा आहे. तसेच दक्षिण महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्वाचे (संस्थानिक, चळवळीतील नेते, सनदी अधिकारी) नवे आकलन, नेतृत्व-तुलना-संबंध, तसेच काही प्रमाणात आलेला वंचितांच्या लढ्याचा इतिहास यादेखील महत्त्वाच्या नोंदी आहेत. प्रादेशिक-स्थानिक इतिहास म्हणून त्यास वेगळे महत्त्व आहे. डॉ. भोसले यांच्या या इतिहासदृष्टीत लोकशाहीच्या उदयापूर्वीच्या रंगभरणाची मीमांसा आहे. लोकप्रवादामागे दडलेल्या घडामोडींचे विश्लेषण, अन्वयार्थास त्यांनी महत्त्व दिले आहे. हे इतिहासकथन व्यक्ती व घटना-घडामोडी-केंद्रित ठेवल्यामुळे या ‘सांगण्या’ला बहुकक्षा प्राप्त झाली आहे. स्थानिक इतिहासाची मोठी सामग्री या ग्रंथात आहे. तटस्थ्यता आणि वस्तुनिष्ठतेचा अभाव असला की, इतिहासकथने सामाजिक रणसंग्रामाची, भावनादुःखीची कथने होतात. या पार्श्वभूमीवर हे इतिहासकथन जागरूक व विवेकी स्वरूपाचे आहे. दक्षिण महाराष्ट्रातील संस्थानांच्या दुर्लक्षित अशा फेरमांडणीमुळे संस्थानी व स्थानिक इतिहासलेखनाला नव्या दिशा प्राप्त होतील."

Be the first to review


Add a review