Avilability: In stock
कामातून शिक्षण घेणे आणि शिक्षणातून काम उभारणे हा गांधींचा शिक्षण विचार डॉक्टर राम ताकवले बालपणापासून जगत आले. याच विचाराच्या आधारे त्यांनी हरगुडे गावात शेती काम, ते तीन विद्यापीठांचे कुलगुरूपद हा वैयक्तिक प्रवास संपूर्ण समाजासाठी फलदायी आणि शिक्षण क्षेत्रासाठी पथदर्शक केला. जीवनशिक्षणाच्या कुठल्याही वाटेवरून चालणाऱ्या कष्टकऱ्यास विद्यापीठातील उच्च शिक्षणाचा मार्ग खुला हवा हा ध्यास घेऊन ताकवले सरांनी मुक्त विद्यापीठांद्वारे शिक्षणगंगा घरोघरी आणि खेडोपाडी नेऊन पोचवली. विद्यापीठांनी भविष्यलक्ष्यी राहून नवनवी ज्ञानक्षेत्रे कवेत घ्यावीत यावर त्यांचा कटाक्ष होता. म्हणूनच ललित कला, कृषिविज्ञान, ते संगणक शास्त्र अशा अनेक विद्याशाखा त्यांनी विद्यापीठांच्या कक्षेत आणल्या. सामान्यातील असामान्यत्व जागे करण्याची ताकद शिक्षणात असते हे ओळखून ते सर्वांना उपलब्ध व्हावे यासाठी झटणाऱ्या एका साधकाची ही शिक्षणयात्रा-जेवढी उद्बोधक, तेवढीच प्रेरणादायी…