Loading

Raoparva

रावपर्व : आर्थिक मन्वंतराचे शिल्पकार

Author : Prashant Dikshit (प्रशांत दीक्षित)

Price: 300  ₹270

Discount: 10%

Avilability: In stock

ISBN : 9789390324316
Publisher : Rajhans Prakashan
Published on : 2021
Binding type : Perfect
Edition : 1
Language : Marathi
Rating :

सरकारला बहुमत नसताना, काँग्रेस पक्षाचा मनापासून पाठिंबा नसताना, पक्षात स्वतःचा गट नसताना आणि पक्षातील अनेक गट विरोधात असताना, गांधी घराण्याशी विसंवाद असताना, डाव्यांचा कडवा विरोध असताना, देशात धार्मिक व जातीय तणाव तीव्र झाले असताना अवघड आर्थिक स्थित्यंतर शांतपणे घडवून आणले ते पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांनी! सोने गहाण ठेवण्याची वेळ आलेल्या भारताला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरून परतवून भक्कम आर्थिक स्थैर्य दिले ते पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांनी! देशाची अर्थशक्ती जागवून त्यांनी उद्योगक्षेत्र अन् बाजारपेठेची पक्की बांधणी केली. नव्या उद्योगधोरणाव्दारे अनेक क्षेत्रे त्यांनी खाजगी उद्योगांसाठी खुली केली. अवघ्या तीन वर्षांत एक्कावन्न हजार कोटींचे परकीय चलन देशाच्या तिजोरीत जमा झाले ते नरसिंह राव यांनी कल्पकतेने राबवलेल्या आर्थिक सुधारणांमुळे ! आर्थिक स्थित्यंतराच्या या अवघड काळाचा आणि त्या काळाला शांतपणे आकार देणाऱ्या शिल्पकाराचा वेधक धांडोळा..

Be the first to review


Add a review