Avilability: In stock
खून, चोरी, घरफोडी, लूट, खंडणी, किडनॅपिंग, बलात्कार यासारख्या गुन्ह्यांमध्ये जेव्हा अल्पवयीन मुलं सापडतात तेव्हा काय असते सामान्यांची प्रतिक्रिया? 16-17 वर्षाच्या मुलाला फाशी द्या, त्यांना कडक शिक्षा द्या ही आणि अशीच ना? या दबावामुळे मुलांच्या कायद्यातही बदल केले जातात. सामान्य सोडा पण कायदे यंत्रणा, त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा, मुलांना ज्या सरकारी निरीक्षण गृहात ठेवलं जातं तिथली यंत्रणा...कसा असतो सगळ्यांचा या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन? ज्या कृतीमुळे या मुलांचं सगळं आयुष्य बदलून जातं ती खरंतर त्यांच्याकडून का होते? काय असतं या मागचं वास्तव? त्यांना या वाटेवर जायला प्रवृत्त करणारे कोण आहेत? या आणि अशा काही प्रश्नांना थेट आणि परखडपणे भिडून लिहिलेलं हे पुस्तक मराठीतलं किंबहुना भारतीय भाषेतलं पहिलंच पुस्तक आहे. मुलांना या अंधार्या जगात ढकलणार्या वास्तवाचा या मुलांशी बोलून, त्यांना समजून घेतलेला हा वेध प्रत्येकानं वाचलाच पाहिजे तरच या पुस्तकात असलेल्या कुणाल, गोट्या, जयेश, पराग, अनिल, अमर, रोहन, जयदीप, शरद व अन्य मुलांच्या जगण्यातल्या भीषणतेची कल्पना येऊ शकेल.