Avilability: In stock
मुलाचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडवण्यात पालकांची भूमिका समजावणारं पथदर्शी पुस्तक. या पुस्तकात मुलांच्या जडणघडणीच्या दृष्टीने कोणता काळ विशेष महत्त्वाचा असतो, वयोमानानुसार मुलांची ‘जडणघडण’ कशी होत असते व ती होत असताना पालकांची भूमिका कशी असावी याचे मार्गदर्शन आहे. नऊ महिने ते पाच वर्षे हा काळ मुलांच्या जडणघडणीच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो; पण या काळाचे महत्त्व पालकांना कळत नाही. ‘मूल लहान आहे, त्याला काय कळणार?’ या विचारापोटी मुले दुर्लक्षित राहतात. एकदा हा काळ हातातून निसटला की, पालकानी स्वतःची मते मुलांवर लादल्याने मग मुलांची ‘जडणघडण’ योग्य प्रकारे होणे कठीण जाते. मुलांमध्ये स्वतंत्र विचारसरणी विकसित होत नाही; अशा प्रकारची स्वतंत्रपणे विचार करण्याची प्रवृत्ती वाढीस लागण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे, हेच जडणघडणीचे गमक आहे.