Avilability: In stock
इ.स.पूर्व तिसर्या शतकापासून इ.स.वीच्या तेराव्या शतकाअखेरपर्यंतच्या कोरीव लेखांचा हा अभ्यास आहे. वेगवेगळ्या कालखंडातील, वेगवेगळ्या राजवंशांचे आणि सामान्य स्त्री-पुरुषांचे हे लेख आहेत. तत्कालीन समाजाचे अंतरंग या लेखांमुळे स्पष्ट होते. पुस्तकाच्या पहिल्या भागात कोरीव लेखांचा अभ्यास, निष्कर्ष मांडले आहेत. दुसर्या भागात काही निवडक कोरीव लेख, त्याचे वाचन, भाषांतर, सारांश, छायाचित्रे दिलेली आहेत. विद्यार्थी, इतिहासप्रेमी, जिज्ञासू वाचक आणि पर्यटक यांना हे पुस्तक अत्यंत उपयोगी आहे. सोपी भाषा, इतिहासाला आणि वास्तवाला धरून केलेले शिलालेखांचे विश्लेषण ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये आहेत.