Avilability: In stock
चिंगीने नेसलेल्या साडीचा अवतार बघून आई म्हणाली, अंगापेक्षा बोंगा फार, तर बाबा म्हणाले, नाकापेक्षा मोती जड. चिंगी आणि चिंटूच्या गोंधळलेल्या चेहर्याकडे बघून आजोबा म्हणाले, अरे मुलांनो, म्हणी म्हणजे भाषेचे वैभव. मोजक्या शब्दात खूप काही सांगणार्या, म्हणी म्हणजे शब्द एक आणि त्यातून सांगायचा अर्थ वेगळाच. तसे चिंटू म्हणाला, आजोबा, म्हणजे तुमच्या दातांसारखे का... खायचे एक आणि दाखवायचे एक? ...असले खुसखुशीत संवाद घरा घरात आणि मुला-मुलींच्या गप्पांतून ऐकू यावेत म्हणून... वाचल्याच पाहिजेत अशा म्हणींच्या गोष्टी.