Avilability: In stock
‘लोकसंस्कृती’ प्राचीन ते अद्यतन मानवी जीवनाला व्यापून राहिलेला समूहमनाच्या संचिताचा सतत वाहता प्रवाह आहे. वाहता आहे, म्हणूनच बदलताही आहे. कधी प्रकृतिधर्माने होणारे सहज बदल, कधी प्रदूषण, कधी समाजाच्या स्थितिगतीनुसार समाजातील प्रभावी गटांनी हितसंबंध जपण्यासाठी केलेले बदल, दिलेली वळणे यांसह लोकसंस्कृतीचा प्रवाह चालू आहे. संस्कृतीविषयक भावनात्मक उमाळे बाजूला ठेवून सहृदय आस्थेने लोकसंस्कृतीतील काही घटकांचे निरीक्षण या टिपणांतून केले आहे. बदल होतानाही आदिमतेपासूनच्या खुणा दर टप्प्यात शिल्लक राहतात. या बदलाच्या पाऊलखुणा शोधण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.