Avilability: Out of stock
(सध्या या ग्रंथाची पूर्वनोंदणी सुरू आहे. २० ऑक्टोबरनंतर ग्रंथ नोंदणी केलेल्या ग्राहकांना पाठवण्यात येईल.) कोणत्याही महापुरुषाला त्याच्या पूर्ण रूपात समजून घेणे ही अतिशय कठीण गोष्ट आहे. त्यातल्या त्यात गांधीजींना. हा ‘महात्मा’ आध्यात्मिक होता. म्हणून स्वत:ला जडवादी, विवेकनिष्ठ, पुरोगामी, धर्मनिरपेक्ष वगैरे समजणारे गांधींकडे तुच्छतेने पाहतात. त्यापैकी काहींचा गांधी हा टवाळीचा विषय असतो. मात्र गांधींच्या विचाराची सुरुवात सत्याच्या शोधापासून झाली. त्यामुळे गांधीजींचे नथुरामच्या पिस्तुलातील गोळ्यांनी सांडलेले रक्त फुकट वाया जाईल असे वाटत नाही.