Avilability: Out of stock
मी हे पुस्तक एका काल्पनिक मार्गदर्शकाशी - गौतमशी - झालेल्या संभाषणाच्या - मालिकेच्या स्वरूपात लिहिलेलं आहे. त्यामागचा उद्देश इतरांना त्यांच्या कार्यक्षेत्री यश मिळविण्यासाठी बौद्ध धर्मातील मार्गदर्शक तत्त्वांची ओळख करून देणं हा आहे. तसंच ही तत्त्वं जी माणसं त्यांच्या दैनंदिन जीवनात आचरतात किंवा पूर्वी त्यांचं आचरण केल्यामुळे अधिक आनंदी आणि समाधानी झाल्याचा ज्यांना अनुभव मिळाला आहे, अशा आपल्या आसपास वावरणार्या अनेकांच्या मुलाखती व किस्सेही मी या पुस्तकात सादर केले आहेत. शिवाय मी अनेक साधे, मुळीच कठीण नसणार आणि प्रत्येकाच्या दिनक्रमात सहज सामावण्याजोगे आहेत, असे स्वाध्याय दिले आहेत - जे प्रामाणिकपणे आणि सातत्याने केले तर मोठा परिणाम घडवून आणू शकतात. ते कार्यक्षेत्री अर्थपूर्णता ठसविण्यासाठी, समतोल विचार राखण्यासाठी आणि कृतार्थतेची भावना जोपासण्यासाठी उपयोगी होतील.