Avilability: In stock
उद्योजक आणि भारताचे गेल्या 35 वर्षांचे धोरण सल्लागार अॅलन रॉजलिंग यांनी ‘बूम कंट्री?’ या पुस्तकात भारतीय व्यवसायामध्ये कसा निश्चित आणि कायमस्वरूपी बदल होऊ घातला आहे, याचा शोध घेतला आहे. उद्योग आणि स्टार्ट-अप्सची नवी लाट, तंत्रज्ञानात झपाट्याने होणारी प्रगती, सरकारी पातळीवरच्या सुधारणा आणि जोखीम पत्करूनही होत असलेली भांडवल उभारणी या घटकांमुळे नवीन उद्योगांचं जाळं फार मोठ्या प्रमाणावर विस्तारत आहे, असं ते लिहितात. या सगळ्याचा परिणाम म्हणून सांस्कृतिक बदलही होत आहेत आणि विशेषत: तरुण पिढीला ‘वेगळं काहीतरी करून बघण्याची’ इच्छा होत आहे. अॅलन यांचं स्वत:चं अनुभवविश्व समृद्ध आहेच. त्या जोडीला, त्यांनी आघाडीच्या, पारंपरिक व्यावसायिक समूहांच्या (टाटा, महिंद्रा, बिर्ला, गोदरेज), पहिल्यांदाच उद्योग सुरू केल्यानंतर आता स्थिरावलेल्या पिढीच्या (सुनील मित्तल, किशोर बियानी आणि नारायण मूर्ती) आणि नवीन पिढीतल्या आधुनिक स्टार्ट-अप्सच्या (सचिन बन्सल, भाविश अगरवाल, विजय शेखर शर्मा) 100 हून अधिक मुलाखतींचा समावेश या पुस्तकात केला आहे. काही सरकारी मंडळींच्याही त्यांनी मुलाखती घेतल्या आहेत. या पुस्तकात रॉजलिंग यांनी भारतात व्यवसाय करण्यासाठी कोणत्या संधी आणि आव्हानं आहेत, पारंपरिक आणि आधुनिक व्यवसायांचं भवितव्य काय, वगैरे बाबींचं तपशीलवार विश्लेषण केलेलं आहे. तरीही, वैश्विक स्तरावर बदलू पाहणारे व्यवसाय आणि प्रचंड क्षमता असूनही भारताने नेहमीच अपेक्षेइतकी कामगिरी न करणं, या दोन कारणांमुळे त्यांच्यासमोर एक कळीचा प्रश्न उभा राहतो: अजूनही वयात न आलेल्या, या काहीशा अपरिपक्व उद्यमशीलतेच्या लाटेमध्ये खरंच भारताची अर्थव्यवस्था बदलून टाकण्याइतकी ताकद आहे का? ही ताकद भारताला नवीन उद्योगांसाठी खर्या अर्थाने एक ‘बूम कंट्री’ करू शकेल का