Avilability: In stock
माटुंगा रेल्वे स्टेशनच्या टॉयलेटमध्ये सापडलेला एका तरुणाचा मृतदेह आणि तिथून सुरू झालेला शोधाचा एक प्रवास... क्षणोक्षणी वेगळ्याच व्यक्तींकडे वळणारी संशयाची सुई आणि या प्रवासात सतत येणारी अनपेक्षित वळणं ! इन्स्पेक्टर झेंडे आणि निवृत्त पत्रकार पीटर डिसूझा यांच्या या शोधप्रवासात उलगडते - ‘मुंबई’ या मायानगरीच्या पोटात दडलेली एक वेगळीच दुनिया...यातलं ‘गे’ व्यक्तींचं जग, त्याला असणारी अनेक अस्तरं ! इथली अगतिकता...शत्रुत्व...स्पर्धा... मैत्री...क्रौर्य...अशा अनेक भावनांचा प्रत्ययकारी अनुभव ही कादंबरी देते. संवेदनशील पत्रकार आणि प्रतिभावान लेखक जेरी पिंटो यांचं मानवी नातेसंबंधांतल्या अनेक कंगोऱ्यांचा वेध घेणारं आणि ‘अस्वस्थ’ मुंबईचं वास्तव दर्शन घडवत एका खुनाच्या मुळाशी जाणारं... मर्डर इन माहीम !