Avilability: In stock
‘बेंजामिन फ्रॅंकलिन’ हे बेंजामिन फ्रॅंकलिन यांचं आत्मचरित्र. सुरुवातीला त्यांनी वृत्तपत्रलेखन केले. फिलाडेल्फियाला गेल्यावर सॅम्युएल किमर नावाच्या माणसाकडे नोकरी केली. गव्हर्नरकडून त्यांना स्वत:चा छापखाना काढण्याचा सल्ला मिळाला आणि नंतर गव्हर्नरसाहेबांनी केलेली फसवणूक त्यांच्या लक्षात आली. मग लंडनमध्ये एका मुद्रकाकडे नोकरी केली. मित्राबरोबर व्यापार केला. परत किमरकडे नोकरी केली. त्यानंतर त्यांनी विविध क्षेत्रांत विविध कामे केली. हार्वर्ड आणि येल विद्यापीठांकडून त्यांना मानद पदव्या मिळाल्या. ते अमेरिकेचे पोस्टमास्तर जनरल बनले. इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यातील युद्धात सैन्य जमवणे, प्रशिक्षित करणे, तोफखाना, किल्लेबांधणी इत्यादी अनेक गोष्टींत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.