Avilability: In stock
डॉ. विक्रम साराभाई यांनी ६०च्या दशकात काही तरुण इंजिनिअर्सना आणि शास्त्रज्ञांना आपल्या चमूत घेऊन एक बीज रोवलं होतं. त्यात रामभद्रन आरवमुदन हा पंचविशीचा तरुणही होता. त्यांच्यापुढे आव्हान ठेवलं होतं ते एक रॉकेट लाँचिंग केंद्र उभारण्याचं. आणि या तरुणांनी हे आव्हान स्वीकारून अशक्य वाटणारं हे काम शक्य करून दाखवलं होतं. न केवळ भारतीयांसाठी, तर जगासाठीही ते एक आश्चर्य होतं... आणि मग द्रष्टे शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांचं स्वप्न साकारू लागलं – ‘भारतीय अंतराळ संशोधन केंद्रा’चं अर्थात ‘इस्रो’चं! या पुस्तकात आरवमुदन ‘इस्रो’ कशी घडत गेली याचे तपशील देऊन त्यासाठी हातभार लागलेल्या व्यक्तिमत्त्वांच्या कहाण्याही सांगतात. तसंच ‘इस्रो’ने राबवलेले प्रकल्प कसे साकारत गेले, त्यासाठी किती प्रयत्न करावे लागले, किती कष्ट घ्यावे लागले, किती अपयशं झेलावी लागली याची रोचक माहितीही ते देतात. रॉकेट लॉंचिंग स्टेशन ते ‘चांद्रयान’ आणि ‘मंगलयान’ यांसारखे गुंतागुंतीचे प्रकल्प राबवणाऱ्या ‘इस्रो’चा हा वटवृक्ष कसा उभारत गेला याचं रंजक कथन पुस्तकातून आपल्यापुढे येतं. स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून या संस्थेसाठ़ी आपलं तन-मन-धन अर्पिणाऱ्या एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने सांगितलेली ही ‘मेड इन इंडिया’ कहाणी...इस्रो : झेप नव्या क्षितिजाकडे !