Avilability: In stock
‘घणघणतो घंटानाद’ हे दि. बा. मोकाशी यांचे पुस्तक मूळ लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ‘फॉर हूम द बेल टोल्स’ या कादंबरीवर आधारित आहे. स्पेनमध्ये झालेल्या नागरी युद्धाच्या काळात लोकांना जो क्रौर्याचा सामना करावा लागला त्याचे वर्णन या कादंबरीत आहे. प्रत्यक्ष युद्धात सहभागी असलेल्यांचे विशेषतः रॉबर्ट जॉर्डनचे विचार आणि कार्यानुभवांतूनच ही कथा साकारली आहे. तसेच उत्तर अमेरिकेतील वृत्तपत्रांसाठी स्पॅनिश नागरी युद्धाचे वार्तांकन करताना हेमिंग्वे यांनी जे पाहिले आणि अनुभवले तेही यामध्ये आले आहे. जॉर्डनचा फॅसिस्टांविरुद्धचा संघर्ष कोणत्या वळणाने जातो, याचं यशासांग चित्रण असणारं पुस्तक म्हणजे घणघणतो घंटानाद होय. या पुस्तकावर आधारित ‘फॉर हूम द बेल टोल्स’ हा चित्रपटही 1943 मध्ये प्रदर्शित झालेला आहे.