Avilability: In stock
दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या नाझी भस्मासुराने लक्षावधी ज्यूंचा क्रूर नरमेध केला. त्या क्रौर्याच्या कहाण्या आजही काळीज फाडून टाकतात. हिटलरच्या छळछावण्यांमध्ये आणि तुरुंगांमध्ये ज्या ज्यूंनी अमानुष छळ सोसला आणि त्या मृत्यूच्या सापळ्यांमधूनही वाचून जे जिवंत राहिले, त्यांचे अनुभव म्हणजे वाहती जखम आहे. अशीच एक भळभळती जखम म्हणजे ‘नाइट’ हे पुस्तक. डॉ. एली वायझेल यांना वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ऑशवित्झ आणि बुशेनवाल्ड इथल्या नाझींच्या तुरुंगात नेण्यात आले. त्यांचे आई-वडील, लहान बहीण - सर्वांनाच जर्मनांनी पकडून नेले. त्या तुरुंगामधल्या यमयातनांमधून फक्त डॉ. एली वायझेल वाचले. आपल्या प्राणप्रिय आई-वडील-बहीण यांचे मृत्यू त्यांना कोवळ्या वयात सोसावे लागले. हा सगळा या विदारक अनुभव त्यांनी या पुस्तकात कमालीच्या प्रत्ययकारी भाषेत मांडला आहे. हे पुस्तक म्हणजे सखोल जीवनचिंतन आहे. स्वतःच्या दुःखाच्या वर्णनाबरोबर मानवी स्वभावावरील त्यांचे भाष्य अत्यंत अर्थघन आहे. पुस्तकाच्या पानापानांमध्ये त्या काळरात्रींचा जिवंत अनुभव ठासून भरला आहे.