Avilability: In stock
टॉड बर्पो हे नेब्रास्कातील इम्पीरिअल या गावी क्रॉसरोड्स वेस्लेयान चर्चचे धर्मोपदेशक आहेत. ते चेस काउन्टी पब्लिक स्कूलमध्ये कुस्तीचे मार्गदर्शक व आणीबाणीच्या प्रसंगी इम्पीरिअल व्हॉलेंटियर फायर डिपार्टमेंटच्या जवानांबरोबर स्वयंसेवक म्हणूनही आगीशी झुंजतात. कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी टॉड `ओव्हरहेड डोअर स्पेशालिस्ट` ही कंपनीही चालवतात. त्यांची पत्नी सोनया ही अर्ध वेळ शिक्षिका असून, त्यांना कॅसी ही मुलगी व कोल्टन आणि कोल्बी असे दोन मुलगे आहेत. कोल्टनच्या आजारपणाची घटना घडण्यापूर्वी टॉडला सॉफ्टबॉल खेळताना पायाला दुखापत होऊन पायातील हाडांचे तुकडे होतात. त्यामुळे दोन महिने त्याला परावलंबी व्हावे लागते. धर्मोपदेशकाचे काम करतानाही एक पाय खुर्चीवर ठेवून प्रवचन द्यावे लागायचे. गॅरेजची दारे बसवून देण्याचा त्याचा उद्योगही शक्तीची गरज असणारा होता, त्यामुळे तोही ठप्प झाला. त्यातच मूतखड्यांचा जुना त्रास उद्भवला. पाठोपाठ छातीत गाठ झाली. ‘हायपरप्लासिया’ असं निदान झालं. ऑगस्टपासून सुरू झालेल्या या दुखण्यांच्या मालिकेतून जरा बरे होऊन सेलिब्रेशन म्हणून सुमारे ७-८ महिन्यांनी बर्पो कुटुंब ‘फुलपाखरांचं दालन’ पाहायला जाते. ...आणि कोल्टनच्या- टॉडच्या मुलाच्या- पोटात दुखणे सुरू होते. त्याला सारख्या उलट्याही होऊ लागतात. तात्पुरत्या उपचाराने फारसा फरक पडत नाही. त्यांच्या कुटुंबात अपेंडिसायटिसचा त्रास असल्याविषयी ते डॉक्टरांना त्याविषयी सांगतात; पण नेब्रास्का येथील डॉक्टर ती शंका फेटाळून लावतात. पण कोल्टनच्या तब्येतीत फरक पडत नाही हे पाहून टॉड व सोनया त्याला नॉर्थ प्लेट मेडिकल सेंटरमध्ये घेऊन जातात. तेथे त्याच्यावर अपेन्डोक्टोमीची शस्त्रक्रिया होते. कोल्टनच्या शरीरात अपेन्डिक्स फुटल्याचे व एक गळूही झाल्याचे त्यांना कळते. यावर उपचार होऊन त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार, तर त्याच दिवशी सीटीस्वॅÂनमध्ये त्याच्या शरीरात अजून दोन गळवे डॉक्टरांना दिसतात. लगेच दुसरे ऑपरेशन करून गळवांतील पूचा निचरा केला जातो. पण त्याच्या बिघडलेल्या तब्येतीत फारसा फरक पडत नाही. अखेर डेनव्हरच्या चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगण्यात येते. त्याच दरम्यान बर्फाचे जारदार वादळ झाल्याने, सगळीकडे बर्फ साठते. टॉड व सोनयाच्या हातात तेव्हा इंपीरिअलच्या चर्चमध्ये कोल्टनच्या तब्येतीसाठी सामुदायिक प्रार्थना करण्याशिवाय काही राहत नाही. आश्चर्य म्हणजे आठवडाभरात मरणपंथाला लागलेल्या कोल्टनमध्ये आश्चर्यकारक सुधारणा दिसायला लागते. सुमारे १७ दिवसांनी कोल्टन कुटुंबासह इम्पीरिअलला परततो. कोल्टन बर्पोची अपोन्डीक्सची इमर्जन्सी शस्त्रक्रिया करावी लागली. एखादा चमत्कार घडल्यासारखा तो त्यातून वाचला म्हणून त्याच्या कुटुंबीयांना खूप आनंद झाला. तरी पुढील काही महिन्यांत अशी गोष्ट घडली की, ज्याची त्यांनी कधी अपेक्षाच केली नव्हती. ती गोष्ट अलौकिक होती. त्यांचा लहानसा मुलगा स्वर्गात जाऊन परत आला, त्या सफरीचा तपशील तो सांगू लागला. चार वर्षांचासुद्धा नसलेल्या कोल्टननं आपल्या आई-वडिलांना सांगितलं की, शस्त्रक्रियेच्या वेळी तो आपलं शरीर सोडून स्वर्गात जीझसकडे गेला होता– त्याचं ऑपरेशन होत असताना हॉस्पिटलच्या दुसऱ्या भागात त्याचे आई-वडील नेमके काय करत होते, हे सांगून त्यानं आपला खरेपणा शाबीत केला. स्वर्गाच्या भेटीबद्दल तो बोलत राहिला. स्वर्गात भेटलेल्या, पण पूर्वायुष्यात कधीही न भेटलेल्या व्यक्तींनी सांगितलेल्या गोष्टी, तसेच त्याच्या जन्माआधी घडलेले प्रसंग त्यानं पुन्हा सांगितले. कोल्टन अजून वाचायलाही शिकला नव्हता, तरी तो करत असलेली स्वर्गाची वर्णनं आणि दुर्बोध तपशील बायबलशी अगदी मिळताजुळता आहे, हे बघून त्याचे आई-वडील चकित झाले. न घाबरता शांत राहून निरागसतेनं कोल्टन पूर्वीच दुरावलेले कुटुंबातील सदस्य भेटल्याचं सांगतो. जीझस, देवदूत आणि परमेश्वर कसा `खूप-खूप मोठा` आहे आणि तो आपल्यावर किती प्रेम करतो, याचंही तो वर्णन करतो. कोल्टनचे विलक्षण साधे शब्द (‘हेवन इज फॉर रिअल’) वापरून त्याच्या वडिलांनी ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे. या पुस्तकात एक वेगळंच जग आपली वाट बघतंय. कोल्टन सांगतो, ``तिथे कोणीही म्हातारं नाही आणि कोणी चश्मापण लावत नाही.`` स्वर्गाविषयीच्या बायबलच्या शिकवणुकीबरोबर लोकांना बर्पो कुटुंबाचे कोल्टनबाबत स्वर्गातील अनुभव आणि त्यांच्या आयुष्यात झालेला बदल प्रत्यक्ष बर्पो कुटुंबाकडून ऐकायला मिळतात.