Avilability: In stock
अफगाणिस्तानातील युद्धाच्या ज्वाळांमध्ये स्त्रीहक्कासाठी, मुलींच्या शाळेसाठी लढणारी कोवळ्या वयातील 'परवाना'. अफगाणिस्तानात वर्षानुवर्षं चाललेल्या युद्धामुळे तिथलं राजकीय, आर्थिक, सामाजिक जीवन ढवळून निघालं आहे. तिथल्या नागरिकांना दैनंदिन जीवनासाठी लढाई लढावी लागते आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर तेथील स्त्रियांवर खूप बंधनं लादण्यात आली. मुलींच्या शाळेत जाण्यावर बंदी आली. मुलींच्या शाळाच बंद पाडल्या गेल्या. स्त्रियांना नोकरी करण्यास मज्जाव करण्यात आला आणि कपड्यांवर, सार्वजनिक वावरावर जुनाट बंधनं लादली गेली. नंतर अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला करून तालिबानी सत्ता संपुष्टात आणली, तरी सर्वसामान्य लोकांच्या आणि स्त्रियांच्या जीवनात काहीच फरक पडला नाही. स्त्रियांचं स्थान दुय्यमच राहिलं. अशा विपरीत परिस्थितीतही परवानासारखी मुलगी शिक्षणाची, फ्रान्सला जाण्याची- स्वातंत्र्यपूर्ण भरारीची स्वप्ने पाहते. अर्थातच त्यासाठी तिला प्रचंड संघर्ष करावा लागतो. संकटात सापडलेल्या स्त्रियांना/ मुलींना आधार देणाऱ्या वीरा मौसीच्या आधारावर ती या स्फोटक परिस्थितीतून कशी बाहेर पडते याचं चित्रण केलं आहे ‘माय नेम इज परवाना’ या पुस्तकात.