Loading

Policlick

पॉलिक्लिक

Author : Sonali Shinde (सोनाली शिंदे)

Price: 150  ₹135

Discount: 10%

Avilability: In stock

ISBN : 9789353610425
Publisher : Paris Publications
Published on : 2019
Binding type : Paperback
Edition : 2
Language : Marathi
Rating :

ऐतिहासिक महत्त्वाच्या अशा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, सोनाली शिंदे यांचे ‘पॉलिक्लिक’ हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. या निवडणुकीत तुम्ही जे मत देत आहात, ते ‘सोशल मीडिया’ने निश्चित केले आहे, हे कदाचित सहजपणे समजणार नाही. मोबाइल नावाचे साधन एका क्लिकसरशी आपल्यालाच वापरून घेत असताना, ते जाणवूही नये, असा हा गोंधळाचा काळ! ‘मत’ आपले खरेच, पण मेंदू कोणी भलताच! गेल्या दशकात, जगभरातील क्रांती-आंदोलने-सत्तांतरे-निवडणुकांनी हे अधोरेखित केले आहे. अशा विश्वव्यापी मीडियाशाहीचे सर्वंकष चित्र तर हे पुस्तक रेखाटतेच, पण अनेक कारस्थानांचा, खोटारडेपणाचा पर्दाफाशही करते. या तीव्र कोलाहलात ज्यांना स्वतःचा आवाज हरवू द्यायचा नाही आणि सजग नागरिक म्हणून असणारी आपली भूमिका सोडायची नाही, त्या प्रत्येकासाठी हे पुस्तक महत्त्वाचे ठरावे. आता ‘साम टीव्ही’त असलेल्या आणि राजकीय पत्रकार म्हणून अल्पावधीत लक्षणीय काम करणा-या सोनाली शिंदे यांनी महापालिका ते लोकसभा निवडणुका, २०१४ चे भारतातील- महाराष्ट्रातील सत्तांतर, पूलवामा हल्ल्यानंतरचे काश्मीरमधील वास्तव , अण्णा हजारे यांचे आंदोलन, मुंबई- दिल्लीतील वेगवेगळी शेतकरी आंदोलने, आदिवासी मोर्चे असे थेट वृत्तांकन केले आहे. प्रिंट, टीव्ही, डिजिटल, तसेच मोबाइल जर्नालिझम असे सर्व प्लॅटफॉर्म्स वापरणा-या सोनाली यांचे ‘सोशल मीडिया’ आणि राजकारण हे अभ्यासाचे विषय आहेत. मुंबईतील पत्रकार तरुणीने लिहिलेले हे पुस्तक त्यामुळेच एका रिपोर्ताजचाही अनुभव देते.

Be the first to review


Add a review