Avilability: In stock
सृष्टीतील अनेक विभ्रम श्री. म्हैसकर यांना खुणावत राहतात. अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी, सौंदर्य आणि जीवमात्रातील जीवन-संघर्षही ते आपल्या मनाच्या कॅनव्हासवर टिपत राहतात. हा अवकाश, हे जग त्यांचेच होऊन जाते. ही एकरूपता त्यांच्या ललित लेखनातून प्रकट होते. चित्रमय शैलीतून साकारलेले हे लेख आपणासही निसर्गवाचन कसे करावे, पक्षिनिरीक्षण कसे करावे, प्राणिमात्रांशी नाते कसे जोडावे, अशा अनेक गोष्टी शिकवतात. निसर्ग आणि पर्यावरणाविषयीचा आपला अनुभव अधिक समृद्ध करतात. हेे लेख वाचताना वाटते की, श्री. म्हैसकर यांना पक्ष्यांची लिपी वाचता येते, प्राण्यांची भाषा समजते, वृक्षांचे शब्द त्यांच्या कानात गुंजारवतात आणि हे सगळे त्यांच्या लेखणीत प्रतिबिंबित होतात. ‘पक्षितीर्थ’ आणि ‘विहंग-विहार’ ही त्यांची पुस्तके याचीच प्रचिती देतात.