Loading

Vihang-Vihar

विहंग-विहार

Author : Vidyadhar Mhaiskar (विद्याधर म्हैसकर)

Price: 190  ₹171

Discount: 10%

Avilability: In stock

ISBN : 9789386594549
Publisher : Padmagandha Prakashan
Published on : 2019
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Rating :

श्री. विद्याधर म्हैसकर यांना लहानपणापासूनच निसर्गानं भुरळ घातली आहे. त्यांना नेहमीच नवे अवकाश सापडते, त्यात नव्या गोष्टी दिसतात. सृष्टिसौंदर्य, प्राणी, पक्षी, झाडं अशा कितीतरी गोष्टींचा रम्य असा विहंग-विहार ते अनुभवतात आणि त्याची अनुभूती ते आपल्या ललित लेखनातून देतात. ही अनुभूती अतिशय प्रसन्न आहे. त्यांना केवळ पक्षिप्रेम नाही; तर त्याबद्दल उत्सुकता आणि जिव्हाळा आहे. त्या जिव्हाळ्याला त्यांच्या प्रतिभेचा ओला स्पर्श आहे. त्यातून त्यांचे झालेले हे प्रातिभ ललितलेखन पुन:पुन्हा वाचावे, असे वाटत राहते. म्हैसकर यांची नजर जशी लेखकाची आहे; तशीच चित्रकाराची आहे. पुस्तकातील रेखाटनांवरून हे लक्षात येईलच. ह्या पार्श्वभूमीवर त्यांचे ललितलेखन चित्रमय न झाले तर नवलच.

Be the first to review


Add a review