Avilability: In stock
जगभरातील वाङ्मयीन व बौद्धिक वर्तुळामध्ये आल्बेर काम्यू नावाचा मोठा दबदबा आहे. नित्शेच्या परंपरेतील काम्यू हा विसाव्या शतकातील मोठा तत्त्वचिंतक व नीतिज्ञ होता; मात्र तो कलेच्या माध्यमातून व्यक्त होत राहिला. आपल्या अभिजात शैलीमुळे त्याचा प्रभाव विसाव्या शतकात व नंतरही राहिला आहे. दोन महायुद्धांनंतरच्या काळातील घडामोडींचा परिणाम, विविध विचार आणि वादांचे उठलेले मोहोळ, फ्रान्सची सांस्कृतिकता, जर्मनीचा दहशतवाद, स्टॅलिन आणि नंतरचा साम्यवाद ह्या सार्या गोष्टींचा परिणाम काम्यूवर होत राहिला. अशा वैचारिक ताण-तणावातून जात असतानाच सार्त्र, कार्ल मार्क्स व आणखी काही समकालीन प्रातिभ बुद्धिवंत, कलावंतांनी व्यापलेले त्याचे बौद्धिक व कलात्मक जीवन समजून घेणे, त्याचा सर्वार्थाने शोध घेणे एक आव्हानच आहे. ह्या पुस्तकातील लेखांतून भारतीय व परदेशी लेखकांनी काम्यूचा शोध विविधांगाने घेण्याचा प्रयत्न केला आहे, हा शोध काम्यूविषयी उत्सुकता असणार्या अभ्यासकांना व त्याच्या चाहत्यांना उपयुक्त ठरेल, हे नक्की.