Avilability: In stock
श्री. खंडेराव कुलकर्णी यांची ‘व्याकरण म्हणजे शब्दशास्त्र’ ही भूमिका या पुस्तकात स्पष्ट झाली आहे, त्या दृष्टीने त्यांनी ‘शब्दविचार’ व ‘शब्दविकरण’ या दोन घटकांवर लक्ष केंद्रित केले आहे. कर्तरी, कर्मणी, भावे इत्यादी प्रयोगांमध्ये व्याकरणदृष्टीने वाक्यांचा विचार येतो. हा प्रयोगदृष्टीने येणारा विचार त्यांनी वाक्यशास्त्रात केला आहे. वाक्यशास्त्र व व्याकरण ह्या दोन्ही भाषिक शास्त्रांची विस्तृत चर्चा येथे केली आहे. अलंकार व वृत्ते ह्या व्याकरणाच्या कक्षेत न येणार्या विषयांचा अभ्यासकांच्या माहितीसाठी परिचय करून दिला आहे. तो शालेय विद्यार्थ्यांना व शिक्षकांनाही उपयुक्त आहे. मराठी व्याकरणाची (शुद्ध) नियमानुसारी व (अशुद्ध) नियमबाह्य रचना नेमकेपणाने समजून घेण्यासाठी व तिला वळणात ठेवण्यासाठी आपले पूर्वसंचित काय आहे, त्याचा परिचय होणे आवश्यक असते. या ग्रंथाने त्याचे आकलन नक्की होऊ शकेल. - डॉ. लीला गोविलकर