Loading

Nehru Va Bose - Samantar Jeevanpravas

नेहरू व बोस : समांतर जीवनप्रवास

Author : Rudraganshu Mukherjee (रुद्रांग्शू मुखर्जी)

Price: 350  ₹315

Discount: 10%

Avilability: In stock

ISBN : 9789386493651
Publisher : Rohan Prakashan
Published on : 2019
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Rating :

`जवाहरलाल नेहरूंएवढी हानी मला कोणीच पोचवलेली नाही', असं सुभाषचंद्र बोस यांनी १९३९मध्ये लिहिलं होतं. नेहरूंकडे बोस यांनी शत्रू म्हणून पाहावं एवढे या दोन राष्ट्रवादी नेत्यांमधले संबंध बिघडले होते का? पण मग सुभाषचंद्रांनी आझाद हिंद सेनेतील एका पलटणीचं नाव जवाहरलाल यांच्यावरून का ठेवलं? आणि १९४५मध्ये सुभाषचंद्रांच्या अकाली निधनाची वार्ता ऐकल्यावर जवाहरलाल यांना अश्रू का अनावर झाले? शिवाय, `मी त्यांना लहान भाऊ मानायचो', असे उदगार नेहरूंनी का काढले? स्वातंत्र्य चळवळीच्या पाश्र्वभूमीवर या दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या जडणघडणीचा शोध रुद्रांग्शू मुखर्जी यांनी या पुस्तकात सखोलतेने घेतला आहे. भिन्न राजकीय विचारधारांमुळे नेहरू व बोस यांच्यात न उमलू शकलेल्या मैत्रीचा अदमास हे पुस्तक बांधतं आणि त्याचसोबत या दोन व्यक्तिमत्त्वांमधीलभेदही अधोरेखित करतं. गांधी नेहरूंकडे आपला राजकीय वारस म्हणून बघत होते, तर सुभाषचंद्रांना मार्गभ्रष्ट पुत्र मानत होते. आधुनिक भारताच्या घडणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या दोन परस्परविरोधी व्यक्तिमत्त्वांची लक्षवेधक कहाणी... नेहरू व बोस समांतर जीवनप्रवास !

Be the first to review


Add a review