Avilability: In stock
"आपली नाटकं लोकांना आवडावी, या करताच केवळ आपण नाटकं लिहिली; तर आपल्याला खूपच खोटं सांगावं लागतं. सर्वसाधारणपणे म्हणायचं तर जिथं सुरक्षित वाटतं, अशी रंगभूमी लोकांना आवडते. म्हणजे गोष्टी सहज-सोप्या असाव्या आणि फार अस्वस्थ करणाऱ्या नसाव्या – अशी रंगभूमी. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर लोकांना नाटक पाहायला जाऊन त्यांचा वेळ वाया घालवायचा असतो. जे घडणार आहे ते त्याच्या पद्धतीनं घडू देण्याच्या मार्गात आपण काहीही आणू शकत नाही. ‘बापरे! हे प्रेक्षकांच्या दृष्टीनं फार अवघड होणार आहे’ असं मी स्वत:ला सांगायला सुरुवात केली, तर मी माझ्या निसर्गदत्त शक्तीचा आणि कौशल्याचा नाश करीन. एडवर्ड अल्बी अपयशाचा धोका पत्करणं हा प्रायोगिकतेतला महत्त्वाचा भाग. हा धोका पत्करून आपली निसर्गदत्त शक्ती अन् कौशल्य जिवंत आणि सुस्थितीत राखणारी मुंबईची प्रायोगिक रंगभूमी. तिच्या तीन दशकांच्या इतिहासाचा दस्तऐवज – प्रायोगिक रंगभूमी : तीन अंक "