Avilability: In stock
अतिशय अभ्यासपूर्वक लिहिलेल्या या पुस्तकातून मी खूप काही शिकलो. मला वाटते की हे पुस्तक सर्वांनीच अवश्य वाचावे. - डॉ. माधव गाडगीळ, पद्मभूषण, पर्यावरणतज्ज्ञ डॉ. अच्युत गोडबोलेंच्या या महत्त्वाच्या ग्रंथात, सध्याच्या ‘विकासाच्या प्रस्थापित संकल्पनांच्या’ बाबतीत मूलभूत स्वरूपाचे प्रश्न उभे केले आहेत. प्रत्येकाने वाचावा असा हा कसदार ग्रंथ उतरला आहे. - प्रो. गणेश देवी, पद्मश्री, भाषातज्ज्ञ आणि ज्येष्ठ विचारवंत ...अनर्थच पुढे निपजता ठेवणारी आर्थिक ध्येयधोरणे सर्वसामान्यांपुढे सोप्या भाषेत तपशीलवार उघडून दाखवणारा हा अर्थ-पूर्ण ग्रंथ आहे. - मेधा पाटकर, सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या एकाच वेळी आश्वासक आणि घाबरवणारी मांडणी. - नंदा खरे, सुप्रसिद्ध लेखक आज ...कोट्यवधी सामान्य नागरिकांना अनुभवाला येणार्या अनर्थसदृश्य परिस्थितीची मुळे दोषी वैचारिक प्रमेयांत आहेत हे या पुस्तकात भरपूर अद्ययावत आकडेवारी आणि संदर्भासहित दाखवून देण्यात आले आहे. - प्रो. संजीव चांदोरकर, टी. आय. एस. एस., मुंबई, सुप्रसिद्ध लेखक आणि अर्थविषयक अभ्यासक अच्युत गोडबोलेंचे हे पुस्तक आपल्या अनेक धोरणांची चिकित्सा करायला भाग पाडते. - मिलिंद मुरुगकर, सुप्रसिद्ध लेखक आणि अर्थशास्त्र अभ्यासक सध्याचा ‘विकास’ हा वास्तवात निसर्गाचा-आणि स्वत:चाही-विनाश आहे. अच्युत गोडबोले ह्यांनी या ग्रंथात यासाठी ढीगभर पुरावे दिलेले आहेत. - दिलीप कुलकर्णी, सुप्रसिद्ध लेखक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ता अर्थरचनेतील समस्यांवर अभ्यासपूर्ण भाष्य करणारे ‘अनर्थ’ एक वेगळा ‘अर्थ’ नक्कीच आपल्यासमोर आणेल. - डॉ. मानसी गोरे, प्रो. अर्थशास्त्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भीषण दारिद्य्र आणि विषमता आणि पर्यावरणाचा उडालेला बोजवारा या सगळ्यांचाच विचार करायला लावणारं पुस्तक म्हणजे ‘अनर्थ’. - मुक्ता मनोहर, सुप्रसिद्ध लेखिका आणि सामजिक कार्यकर्त्या श्री. अच्युत गोडबोले यांनी या पुस्तकाद्वारे विकासाच्या सध्याच्या प्रचलित संकल्पनेवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे... - अभिजित घोरपडे, संपादक, ‘भवताल’, पर्यावरण अभ्यासक भांडवलशाहीत भारतीय लोकांचे वा अर्थव्यवस्थेचे प्रश्न समृद्ध आकडेवारीने समजून घेण्यासाठी एक उत्कृष्ठ ग्रंथ! - प्रो. श्रीनिवास खांदेवाले, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ या पुस्तकातील आकडेवारी व विश्लेषण सरकार आणि समाजाची झोप उडवणारी आहे. - उल्का महाजन, सामजिक कार्यकर्त्या