Avilability: Out of stock
आर्य भारतात आल्यापासून त्यांचा इथल्या लोकांशी आलेला संबंध व त्यातूनच स्वत:ला बहाल केलेले श्रेष्ठत्व, ह्याचबरोबर इतरांना कमी लेखणे म्हणजेच पर्यायाने जातींची आणि अस्पृश्यतेची सुरुवात. भारतीय समाजात अनंतकाळ रुजलेल्या या सर्व अनिष्ट प्रथांचा परामर्श येथे घेतला आहे. या पुस्तकातील निरनिराळ्या प्रकरणांत दलितांच्याच प्रश्नाचे प्रतिनिधित्व केले गेले आहे. हे पुस्तक चार भागात विभागले गेले आहे. पहिल्या भागांत भारतीय संस्कृतीत अस्पृश्यतेची सुरुवात व वाढ कशी झाली याबद्दल सांगितले आहे. भारतीय समाजाकडे पाहण्याचा दलितांचा दृष्टिकोन आणि उच्चपातळीच्या हिंदूंचा पाहण्याचा दृष्टिकोन सारखा नाही, ह्याचा विचार दुसर्या भागात केला आहे. तिसर्या भागात भारतीय समाजात दलितांसाठी वापरलेली पद्धती (शास्त्र) आणि त्याच्या वापराचा विचार केला आहे. चौथ्या भागात दलितांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला आहे. भारतातील दलित जातींवर नीट अभ्यास करून लिहिलेले हे पुस्तक आहे. इतिहास व समाजशास्त्र या विषयाच्या विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल याची खात्री आहे.