Loading

Pidheejat

पिढीजात

Author : Shrikant Deshmukh (श्रीकांत देशमुख)

Price: 600  ₹540

Discount: 10%

Avilability: In stock

ISBN : 9789386628565
Publisher : Rajhans Prakashan
Published on : 2019
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Rating :

एकाएकी नवनाथच्या डोळ्यांतून पाणी आलेलं. किती साधं असतं या लोकांचं जगणं. किती साधी आणि सोपी मागणी. मरणाची भीती नाही. जन्माला आलेले सारेच जाणार आहेत. कितीतरी मोठे आले आणि गेले. आम्ही तर साधी माणसं. पोटापुरतं मागणारी. धरणीमातेला मृत्यू थांबव, हे त्यांचं मागणं नाही; तर फक्त जीवन अमर ठेव. किती साधी प्रांजळ मागणी. नवनाथ थरारून गेला. काय बोलावं, हे त्याला कळेना. या सरकारी नोकरीमुळं जगण्याचे कितीतरी स्तर आपण जवळून पाहतोय. यापूर्वी आपण करत असलेल्या मास्तरकीत हे सारं पाहता आलं असतं? खरी निखळ माणसं आपल्या भोवतालच्या भेडसावणाNया गर्दीपासून, गळेकापू स्पर्धांपासून कितीतरी दूर असतात. लांबलांब पसरलेल्या डोंगररांगांच्या एखाद्या खोल घळीत वाढणाNया एखाद्या अज्ञात झाडासारखी. जगाच्या कल्याणाची आणि जीवनाच्या अमरत्वाची मागणी करणारे असे कितीतरी तुकोबा, ज्ञानोबा खेड्यापाड्यांतून, आदिवासी वस्त्या, लमाण तांड्यांतून भेटतील. त्यांच्या या निरागस प्रार्थनेमुळंच तर हे जग जिवंत नाही ना?

Be the first to review


Add a review