Avilability: In stock
लेखकाचे हे पहिलेच पुस्तक असल्याने ‘मापापेक्षा’ जास्तच देणारे आहे. दीडेकशे पानांचा मजकूर ‘बन चुक्या’ लेखकाने सहाशे पाने ताणला असता! पण हे क्षम्यच मानायला हवे. एक म्हणजे लेखक वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या संकल्पना कोणत्या परिस्थितून उपजल्या ते सांगायला मानवाचा इतिहासही रेखतो. त्यातली सर्व माहिती, सर्व मते तपासून, आधार देऊनच मांडतो. कुठेही ‘बाबावाक्य’ नाही, की दिखाऊ विद्वत्ता नाही. आपल्याला कोणते मत पटते व ते का पटते, हे सतत स्पष्ट केलेले आहे. उपहासासारखे पोरकट हत्यार कुठेही वापरलेले नाही. हा विवेकीपणा, हे शहाणपण, दुर्मिळ आहे. - नंदा खरे (लेखक - कहाणी मानवप्राण्याची, वारूळ पुराण, अंताजीची बखर, डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य इत्यादी)