Avilability: In stock
प्रसिद्ध लेखक ल. सि. जाधव यांच्या ‘होरपळ’ या गाजलेल्या आत्मकथनाचा हा दुसरा भाग. हे आत्मकथन एकाच वेळी वैयक्तिक आणि सामाजिक अशा दोन्ही पातळ्यांवरचं दु:ख व्यक्त करतं. आणि त्याकडे उदार दृष्टीनं पाहण्याचाही प्रयत्न करतं. हा ‘सूळकाटा’च, सलत राहणारा, सलता सलता अंतर्मुख करणारा आणि जीवनविषय अंतर्दृष्टी देणाराही.