Avilability: In stock
जगातील सर्वश्रेष्ठ लेखक, नाटककार म्हणून विल्यम शेक्सपिअर यांचे नाव घेतले जाते. शोकांतिका, सुखांतिका आणि एतिहासिक नाटकांचे तीन प्रकार शेक्सपिअरनी नाटकांसाठी वापरले. त्यात शेक्सपिअरच्या शोकांतिका विशेष गाजल्या. शेक्सपिअरनं जागतिक रंगभूमीला नवे आयाम दिले. चारशेहून अधिक वर्षे जागतिक साहित्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या या साहित्यिकाची कुमारांना ओळख व्हावी , यासाठी शेक्सपिअरची नाटकं या मालिकेत विशेष शैलीत सादर करण्यात आली आहेत. शेक्सपिअरच्या बावीस लोकप्रिय नाटकांचा यात समावेश आहे. अ मिडसमर नाइट्स ड्रीम, अॅज यू लाइक इट,ट्वेल्थ नाइट,द टू जेन्टलमेन ऑफ व्हेरोना सारखी कल्पनारम्य नाटके, ऑथेल्लो,किंग लियर,मॅकबेथ,रोमियो अॅन्ड ज्यूलिएट,हॅम्लेट सारख्या शोकांतिका आणि द टेंप्टेस्ट, द विंटर्स टेल,सिंबेलाईन सारखी सौंदर्यवादी नाटके यात समाविष्ट आहेत.