Avilability: In stock
विश्वमानव जातीच्या समस्यांपैकी महिलांची दर्जाहीनता, दारिद्र्य या समस्यांचे निर्मूलन करून त्यांचे आर्थिक , सामाजिक व राजकीय सबलीकरण आणि सर्वांगीण ग्रामीण विकासाकरिता अल्पबचत नियोजनाचा स्वीकार केला जात आहे. महिलांना आर्थिक, सामाजिक बळ देण्याकरिता, नारीशक्ती एका संघटनेत बांधण्याकरिता तसेच महिलांची काटकसरवृत्ती, संचितवृत्ती, प्रामाणिकपणा, नेतृत्व, उद्योजकता या गुणांना बळकटी देण्याकरिता आणि ग्रामीण अर्थकारण व सामाजिक स्तर यामध्ये परिवर्तन करून बलशाली भारत बनवण्याकरिता, अल्पबचत नियोजन (बचत गट) हे तत्त्वज्ञान उपयुक्त ठरत आहे. म्हणून प्रस्तुत पुस्तकात अल्पबचतीेला बळकट करण्याकरिता हे पुस्तक प्रबोधनात्मक ठरेल अशी अपेक्षा आहे.