Avilability: In stock
समाजस्वास्थ्यासाठी लैंगिक शिक्षणाचे आद्य प्रवर्तक प्रा. र. धों. तथा रघुनाथ धोंडो कर्वे यांनी तत्कालीन सनातनवाद्यांशी प्रखर लढा देऊन १९२३ मध्ये ‘संततिनियमन : विचार व आचार’ हे पुस्तक लिहून एक धाडसी प्रयत्न केला व समाजप्रबोधनाची एक दिशा दाखवली. त्या प्रयत्नाच्या एक पाऊल पुढे टाकून सद्य:स्थितीत तरुणांना अधिक सजग करण्यासाठी ‘लैंगिक शिक्षण’ या परिवर्तनशील पुस्तकात समाजहित डोळ्यांसमोर ठेवून, बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोनातून उमलत्या तरुण पिढीला लैंगिक शिक्षण व त्यातील शास्त्रीय वास्तवता अधिक सोप्या पद्धतीने स्पष्ट केली आहे. प्रत्येक कुटुंबातील या विषयाचा सुसंवाद या पुस्तकामुळे सहजसाध्य होण्यास निर्विवादपणे मोलाचे