Avilability: In stock
भारतीय तत्त्वज्ञान परंपरेमधील दक्षिणेतील प्रमुख मताचार्यांपैकी एक – श्रीमध्वाचार्य (इसवी सन १२३८-१३१७) यांचे समग्र जीवन चरित्र, कार्य, योगदान याचा मागोवा घेणारे असे हे मराठीतील “पहिले” पुस्तक आहे. आचार्यांच्या जीवन चरित्रातील प्रसंग तसेच त्यांची शिष्यपरंपरा, ग्रंथसंपदा, महाराष्ट्राशी असलेले नाते, अद्वितीय योगदान या सगळ्याचा समावेश प्रस्तुत पुस्तकात केलेला आहे. संगीत-नृत्य-नाट्य, राजकारण, गिर्यारोहण, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, कवी, संशोधक, भाष्यकार आणि भगवान वेदव्यासांचे अंतरंग शिष्य अशा आचार्यांच्या अनेकविध पैलूंचे दर्शन वादिराज लिमये यांनी प्रस्तुत पुस्तकातून घडवले आहे.