Avilability: In stock
एकदा का मनुष्याला आपल्या स्वत:मधल्या अस्तित्वाची जाणीव झाली. त्याचं अवधान जागृत झालं की, स्वत:च्या ठिकाणचा दिव्यांश आणि प्रत्येक जीवाच्या ठिकाणी असलेली चेतना एक आहेत याची त्याला जाणीव होते. त्या जीवाविषयी त्याला प्रेम वाटू लागतं. जोवर हे घडत नाही तोवर बहुतेक लोक बाह्यरूपाकडे, मनोकायिक अस्तित्वाकडेच पाहतात. स्वत:च्या आणि आंतरिक चेतनेचं त्यांना भान नसतं. ज्यांना हे भान असतं त्यांना भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे काहीतरी अधिक आहे, याची जाणीव असते. बुद्ध, जीझस आणि अन्य अनाम आत्मे मनुष्य चेतनेच्या बहराची उमलण्याची साक्ष आहेत. त्यांनी मनुष्यजातीला दिलेल्या संदेशांचे आज विकृतीकरण झाले आहे. मनुष्यजातीची मनोरचना यांत्रिक झाली आहे. तिच्या जडतेतून चैतन्याचा प्रकाश आरपार जाऊन ती पारदर्शक होईल का? नाम, रूप, व्यक्तिमत्त्व, अहं यांच्या पिंजऱ्यातून ती मुक्त होईल का? या आंतरिक परिवर्तनाची गती कशी वाढवता येईल? अहं केंद्रित अशा चेतनेच्या प्राचीन काळापासून असलेल्या स्थितीला कसं ओळखायचं? नव्याने उदित होत असलेल्या मुक्त चेतनेची तरी खूण काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आणि सृष्टिविकासाला अनुकूल अशी नवी जीवनपद्धती या पुस्तकात सांगितली आहे. अहंकाराला दूर सारून चेतना जागरणाची सुरुवात करणं आणि स्वरूपाचा म्हणजे स्वत:चा शोध घेणं हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे.