Avilability: In stock
स्वातंत्र्याच्या चळवळीचे नेतृत्व करणारी आणि स्वतंत्र भारताचा पाया घालणारी माणसे कर्तृत्वाने जशी मोठी होती, तशी ती मनानेही मोठी होती. त्यांच्यात मतभेद असणे स्वाभाविक होते; पण आपले मतभेद बाजूला सारून देशहितासाठी एकमनाने काम करावे लागेल, याचेही त्यांना भान होते. काळ जसा समजून घ्यावा लागतो, तसेच त्या काळाला कलाटणी देणारी सामर्थ्यशाली माणसेही समजून घ्यावी लागतात. ही एक बौद्धिक आनंद देणारी प्रक्रिया आहे.