Avilability: Out of stock
विनायक पांडुरंग करमरकर. कौशल्यपूर्ण शिल्पनिर्मितीचा सातत्यानं उत्कृष्ट आविष्कार! त्यांच्या १९२८मधील पुण्याच्या पहिल्या शिवस्मारकानं इतिहास घडवला. त्यानंतर करमरकरांनी भारतीय स्मारकशिल्पांच्या क्षेत्रात आणि स्वानंदासाठी केलेल्या शिल्पांनी मापदंडच निर्माण केला. दिमाखात जगलेल्या या शिल्पकाराचं जीवन म्हणजे 'कला व व्यवहार यांचा मेळ आणि कोरणी व लेखणीचा अपूर्व संगम!'