Avilability: In stock
हृषिकेशच्या सगळ्या कथांमधून आरपार जाणारं एक सूत्र आहे. ते म्हणजे त्यात दिसणारी कल्पनाशिलता. त्याच्या प्रत्येक कथेच्या केंद्रस्थानी मुठीतल्या काजव्यासारखी लुकलुकणारी एखादी कल्पना असते. हृषिकेश त्या कल्पनेच्या सगळ्या शक्यतांचा शोध घेत जातो. तिचे सगळे कोपरे धुंडाळतो. महत्वाचं म्हणजे, तो या प्रक्रियेचा आनंद घेतो. म्हणूनच त्याच्या कथांमध्ये एक चैतन्य सळसळताना जाणवतं. 'घनगर्द' या कथांसंग्रहामधून हृषिकेशच्या कथेने एक उंबरठा ओलांडला आहे. ती आता अधिक व्यामिश्र आणि पैलूदार होते आहे भय आणि अदभूताचा मार्ग तिने सोडलेला नाही. मात्र त्या मार्गाला आता अनेक नव्या वाटा फुटलेल्या आहेत. त्या नेमक्या कुठे जाणार हे कोणीही सांगू शकणार नाही. पण हा प्रवास दीर्घ आणि रोमहर्षक असेल. याची खात्री 'घनगर्द' वाचल्यावर पटते, हे महत्वाचं. - निखिलेश चित्रे (प्रस्तावनेतून)