Avilability: In stock
"मराठ्यांच्या लष्करी प्रशासनासंबंधीचे संशोधन आणि लेखन काही थोड्या लोकांनी केले आहे. तथापि, डॉ. सुरेंद्रनाथ सेन या बंगाली इतिहास संशोधकाने मराठी, इंग्रजी व पोर्तुगीज साधनांचा अभ्यास करून ’ढहश चळश्रळींरीू डूीींशा ेष चरीरींहरी’ हा ग्रंथ सन १९२८ साली लिहिला आणि मराठ्यांच्या लष्करी व्यवस्थेसंबंधीच्या अभ्यासासाठी एक महत्त्वाचे साधन उपलब्ध करून दिले. या ग्रंथाचा मराठी अनुवाद आजवर कोणीही केला नव्हता; पण ही उणीव डॉ. सदाशिव शिवदे या इतिहास संशोधकाने लक्षात घेऊन मराठी वाचकांना हा ग्रंथ उपलब्ध करून दिला आहे. संपूर्ण मराठेशाहीच्या लष्करी प्रशासनावरचा हा महत्त्वाचा मराठी ग्रंथ इतिहास अभ्यासकाला निश्चितपणे उपयुक्त ठरेल. "