Avilability: In stock
‘मोघ पुरुस’ ही कादंबरी देव-धर्म-माणुसकी यांचा प्रेम, श्रद्धा आणि मृत्यु या तीन वैश्विक सत्याच्या आधारे वेध घेण्याचा प्रयत्न करते. ज्यांना आज देव मानलं जातं ती मूळ माणसंच होती आणि आपलं त्यांच्याशी माणुसकीचंच नातं असायला हवं असा विचार या कादंबरीत मांडला आहे. देव ही संकल्पना स्पष्टपणे मोडीत काढत, देवाच्या नावावर चाललेला धर्माधिष्ठित स्वार्थाचा हिंसाचार आणि द्वेषाचार थांबवण्याचं आव्हान आजच्या माणसाला कसं पेलता येईल यावर यात विचार केला आहे. देव आणि धर्म हे माणसाच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आहेत, उलट त्यांच्यामुळेच सामान्य मानवी जीवनात असंख्य प्रश्न निर्माण होऊन त्यांतून माणूसकीलाच सुरुंग लावले जात असल्याचं एक भयावह चित्र जगभरात दिसतंय. देव-धर्माच्या या अजगरी विळख्यातून सुटण्यासाठी आपल्याला विज्ञान आणि महामानवी समुहांचा आश्रय घ्यावा लागेल अशी एक संकल्पना यात उभारण्यात आली आहे.