Avilability: In stock
खूप वर्षांनी भेटलेले मित्रं सोशल मीडियामुळे ‘कनेक्टेड’ असले, तरी प्रत्यक्षात मात्र बरेच बदललेले असतात. हा ताण त्यांच्या मैत्रीची ‘छत्री’ कशीबशी पेलत राहते... आर्थिक मंदी, ‘आयटी’तले लेऑफ यांमुळे कोलमडू लागलेलं एका जोडप्याचं आयुष्य एक साधा ‘भाजीवाला’ सावरू पाहतो, अन् अचानक गायब होऊन जातो... आचकट बोलणार्या ‘ट’च्या मनात कितीतरी वर्षं एक जखम ठसठसत असते, आणि ती जेव्हा उघडी पडते तेव्हा एक ‘टची गोष्ट’ समोर येते... आधुनिक जगण्याच्या रेट्यात आर्यन-संजिताची मनं एकमेकांपासून एवढी दुरावत जातात, की संबंधांचं ‘अॅबॉर्शन’ होणार आहे हे त्यांना समजत नाही... एका साध्याशा पोस्टमुळे सुरू झालेल्या चर्चेतून जेव्हा ‘अभ्र्यांमागे दडलेल्या फँड्री’चा भेसूर चेहरा समोर येतो तेव्हा सुन्न व्हायला होतं... आपण कुठून आलो, या प्रश्नाचा शोध घेत जेव्हा एक गर्भ भूत-वर्तमान-भविष्य अशा तिन्ही काळात संचार करू लागतो, तेव्हा ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाच्या रहस्या’चा गुंतागुंतीचा गोफ विणला जातो... जगण्यातल्या ताणांचा, पेचांचा-गुंत्यांचा आणि प्रश्नांचा सखोल वेध घेणार्या, वास्तव-कल्पित व मिथककथा यांच्या बांधणीतून तयार झालेल्या ‘आजच्या काळाच्या’ आठ कथांचा संग्रह!