Avilability: Out of stock
मराठी रियासत आणि मराठ्यांचा इतिहास - ग्रंथसूची आठ खंड पूर्वनोंदणी : २५ डिसेंबर २०१७ पर्यंत विक्री वितरण : १० जानेवारी २०१८ अडीचशे वर्षांचा मराठेशाहीचा समग्र आणि सविस्तर इतिहास म्हणजे मराठी रियासत. १९८६ - ८७ साली रियासतीच्या नवीन आवृत्यांचं संपादन करताना नव्याने उपलब्ध झालेले सगळे संदर्भ तपासण्यात आले होते. हे संदर्भ जमा करून त्याची शिस्तबद्ध सूची करण्याचं काम संपादक गर्गे यांच्या कन्या कविता भालेराव यांनी केलं होतं. मराठा इतिहासाच्या अभ्यासकांना उपयोगी व्हावं या हेतूने या सूचीचं 'मराठ्यांचा इतिहास :ग्रंथसूची' नावाने पुस्तकही आम्ही प्रकाशित केलं होतं. गेल्या दोन - तीन वर्षांमध्ये कविता भालेराव यांनी महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरीलहीअनेक ग्रंथालये वाचनालये आणि इतिहासविषयक संस्था यांना प्रत्यक्ष भेटी देऊन मराठा इतिहासाबद्दलचे अनेक नवे संदर्भ मिळवले, जुने अद्यायावत केले, मराठी बरोबरच इंग्रजी संदर्भ शोधले आणि ही सूची शक्य तेवढी परिपूर्ण केली. सुमारे सहाशे पृष्ठांची ही सूची हा मराठी रियासतीचा नववा खंड म्हटल्यास वावगे ठरू नये. या ग्रंथाची उपयुक्तता लक्षात घेऊन आम्ही मराठी रियासतीसोबत याही ग्रंथाचा समावेश केला आहे..